महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथीक परिषदेचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२१ मध्ये संपल्यामुळे होमिओपॅथी परिषदेचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालविण्याच्या प्रयोजनार्थ शासन पत्र क्र. महोप-०२२१/प्र.क्र. २७/अधिनियम दि. २२.२.२०२१ अन्वये डॉ. सोमनाथ त्रिंबक गोसावी यांची महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे "प्रशासक" म्हणून नियुक्ती केली आहे. डॉ. सोमनाथ गोसावी यांनी दि. २३ फेब्रुवारी २०२१ मध्यान्हपूर्वपासून "प्रशासक" पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सदरचा कार्यभार स्वीकारताना मा. आ. विक्रमजी काळे , केंद्रिय होमिओपॅथी परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. डॉ. अरुणजी भस्मे, सांगली जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष मा. पृथ्वीराज पाटील, शिवा ट्रस्टचे अध्यक्ष मा. डॉ. बाळासाहेब पवार, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. डॉ. बाळकृष्ण गायकवाड, होमिओपॅथिक परिषदेचे प्रबंधक मा. डॉ. कैलास सोनमनकर, हिम्पामचे सचिव मा. डॉ. चंद्रकांत पाटील, हिम्पामचे सहसचिव व प्रतिभा ट्रस्टचे अध्यक्ष मा. डॉ. प्रतिक तांबे, मा. डॉ. राजेश राव, मा. डॉ. परेश नवलकर, मा. डॉ. रविंद्र गोसावी, मा. डॉ. राम सांगळे, नवी मुंबई निमा चे अध्यक्ष मा. डॉ. विनायक म्हात्रे, मा. डॉ. माधव चौधरी, लातूर होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष मा. डॉ. संजय गव्हाणे, नवी मुंबई बॅकेच संचालक मा. प्रकाश चौधरी आदि सर्वजण उपस्थित होते. तसेच मा. मुख्यमंत्री ना. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब, मा. उपमुख्यमंत्री ना. श्री. अजितदादा पवार साहेब, महसूल मंत्री मा. ना. श्री. बाळासाहेब थोरात साहेब, वैद्यकीय शिक्षण मंत्री- मा.ना. अमितजी देशमुख साहेब, आरोग्य मंत्री मा.ना. राजेशजी टोपे साहेब वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री मा. ना. श्री. येड्रावकर साहेब आणि इ. मान्यवरांनी डॉ. सोमनाथ गोसावी यांचे अभिनंदन केले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनावर उपचार रविवार, १६ मे, दुपारी १२ वाजता डॉक्टरांसाठी एक खास कार्यक्रम श्री. उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राच्या टास्क फोर्स सदस्यांशी थेट संवाद डॉ. संजय ओक, डॉ. शशांक र जोशी आणि डॉ. राहुल पंडित पहा OneMD च्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर यूट्यूब Link facebook Link
बुधवार दि. ३१/०३/२०२१ रोजी मा.आमदार. श्री.विक्रमजी काळे, केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा .डॉ.अरुण भस्मे व सांगली जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष मा. श्री.पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली होमिओपॅथिक डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने आरोग्य मंत्री यांची भेट घेतली व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा केली. शिष्टमंडळाने राज्याचे आरोग्यमंत्री मा. ना. श्री.राजेश टोपे यांची भेट घेऊन कोव्हीड-१९ च्या काळात होमिओपॅथिक डॉक्टरांनी राज्य शासनाला केलेल्या सहकार्यानंतरही राज्य शासन होमिओपॅथिक डॉक्टरांबाबत दुजाभाव करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. १०८ अम्बुलन्स,नगरपालिका आरोग्य भरती प्रक्रियेत काही नगरपालिकेनी होमिओपॅथिक डॉक्टरांना वगळणे,आयुष डॉक्टरांच्या मानधनात असणारी तफावत,एन.एच.एम मध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना समाविष्ट करणे इ. मागण्यांसदर्भात चर्चा केली.यावेळी मा. ना. श्री.राजेश टोपे यांनी,कोरोना काळात होमिओपॅथिक डॉक्टर बजावत असलेल्या सेवेबाबत समाधान व्यक्त केले व होमिओपॅथिक डॉक्टरांवर प्रशासनाकडून वारंवार होणाऱ्या दुर्लक्षाबाबत शासन नक्कीच मार्ग काढेल व यासाठी सचिव,आरोग्य सेवा,यांच्यासह सर्व संबंधीत अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढू असे सांगितले. या शिष्टमंडळात होमिओपॅथिक परिषदेचे प्रशासक डॉ.एस.टी.गोसावी,शिवा ट्रस्टचे अध्यक्ष मा.डॉ.बाळासाहेब पवार, हिम्पाम,महाराष्ट्राचे सहसचिव मा .डॉ.प्रतिक तांबे,परिषदेचे माजी.सदस्य मा .डॉ.बाळकृष्ण गायकवाड, मा.डॉ.पागे मॅडम, महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे प्रबंधक मा.डॉ.कैलास सोनमनकर हे उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने डॉ.एस.टी.गोसावी यांची नुकतीच महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेवर प्रशासक म्हणून नियुक्ति केली त्यानिमित्त बुधवार दि.३१/०३/२०२१ रोजी मा.आमदार श्री.विक्रमजी काळे, केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा.डॉ.अरुण भस्मे व सांगली जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष मा.ना. श्री.पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली होमिओपॅथिक डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने आज वैद्यकिय शिक्षण मंत्री मा.श्री अमितजी देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा केली. यावेळी बोलताना कालेज फेडरेशनचे अध्यक्ष डॉ.मा .विक्रम काळे यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्री श्री.अमित देशमुख यांनी डॉ.एस.टी.गोसावी यांची निवड करुन एका अनुभवी व कार्यक्षम व्यक्तिची निवड केल्याबद्दल आभार मानले.त्यावेळी मा.मंत्री महोदयांनी परिषदेचा कारभार पारदर्शक व गतीमान करण्यावर भर द्यावा असे सुचविले व परिषदेच्या मागणीनुसार लवकरच सचिव स्तरावर बैठक घेऊन होमिओपॅथिक डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचं मान्य केले.यावेळी मा .डॉ.तात्याराव लहाने हे सुध्दा उपस्थित होते. या शिष्टमंडळात होमिओपॅथिक परिषदेचे प्रशासक मा .डॉ.एस.टी.गोसावी, शिवा ट्रस्टचे अध्यक्ष मा.डॉ.बाळासाहेब पवार, हिम्पाम महाराष्ट्रचे सहसचिव मा .डॉ.प्रतिक तांबे,परिषदेचे माजी.सदस्य डॉ.बाळकृष्ण गायकवाड, मा.डॉ.पागे मॅडम, महाराष्ट्र होमिओपॅथिक परिषदेचे प्रबंधक मा.डॉ.कैलास सोनमनकर हे उपस्थित होते.
मुंबई दि. २७ - राज्यातील होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही देताना राज्यात शासकीय होमिओपॅथिक दवाखाने सुरु करण्या संदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मा. आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी दिले. मंत्रालयात होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत बैठक झाली. यावेळी आमदार मा. विक्रम काळे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त मा. डॉ. रामास्वामी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष मा. डॉ. उत्तुरे, केंद्रिय होमिओपॅथी परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. डॉ. अरुण भस्मे, विद्यापिठाच्या विद्या परीक्षेचे सदस्य मा. डॉ. बाळासाहेब पवार, आयुष विभागाचे संचालक मा. डॉ. कुलदिपराज कोहली, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक मा. डॉ. सोमनाथ गोसावी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सह संचालक मा. डॉ. विजय कंदेवाड, आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक मा. डॉ. लहाने, एन.एच.एम. चे. सहाय्यक संचालक मा. डॉ. घोलप, विधी व न्याय विभागाचे संयुक्त सचिव- मा. डॉ. नितिन जीवने, मा. वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव मा. श्री. संजय कमलाकर, वैद्यकीय शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी (अधिनियम) मा. श्री. विजय शिंदे, आयुष विभागाच्या सहाय्यक संचालक मा. डॉ. श्रध्दा सुडे, महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे प्रबंधक मा. श्री. संजय देशमुख, राष्ट्रीय होमिओपॅथी कमिशनच्या सल्लागार परिषदेच्या सदस्या मा. डॉ. प्रमोदिनी पागे आणि मा.डॉ. बाळकृष्ण गायकवाड, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे रजिस्ट्रार मा. डॉ. केलास सोनमनकर, मा. डॉ. प्रतिक तांबे आणि परिषदेचे विधी सल्लागार अँडव्होकेट मा. श्री. बनसोडे उपस्थित होते. शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास तातडीने सादर करावा असे मा. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या (क्र. १०८) स्ग्णवाहिकांमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांना नियुक्ती मिळावी यासाठी त्यासंदर्भात असलेले न्यायालयाचे निर्णय याबाबत विधी व न्याय विभागाचे मत नोंदविण्यात येईल असे मा. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच केंद्रिय आरोग्य मंत्र्यांची भेट घेण्यात येणार असून त्यावेळी त्यांच्याशी होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्या संदर्भात चर्चा केली जाईल असेही त्यांनी सांगितले. सीसीएमपी कोर्स केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये नोंदणी मिळण्या संदर्भात विधी व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्याचे निर्देश मा. आरोग्यमंत्र्यांनी दिले.
Guidelines for Homoeopathy Practitioners for Prophylaxis and Symptomatic Management of COVID-19 Patients in Home Isolation
होमिओपॅथी शास्त्राचे जनक डॉ. सॅम्युअल हँनेमन यांना २६६ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... जागतिक होमिओपॅथी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ... 💐💐💐💐💐💐 डॉ. सोमनाथ गोसावी. प्रशासक- महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, मुंबई.
MCH President Dr Nitin Gawade, is inviting you to register for 'International Integrative COVID-19 Patient Management Webinar'. Learn about the best approach to COVID-19 management from World Renowned Speakers- like Dr. Beth Dupree, Dr. Pratibha Shah, Acharya Ishan Shivanand, Dr. Farokh Master and many more, and understand the integration of Modern medicines, with alternative systems of Medicine. Registration Free
The Medical Education & Drugs Department (MEDD) – Government of Maharashtra has prepared in the fight against COVID – 19 virus. These compendium provide guidelines for health care professionals dealing with the COVID – 19 Pandemic. The compendium list is as following:
Note : All the registeted practitioners of Homoeopathy should download these compendium from the above given link so that they can utilize these guidelines while dealing with COVID – 19 pandemic and its patients.
"Dr. C.F.S.Hahnemann"
265th Birth Anniversary
Wish you all Happy World Homoeopathy Day
मित्रहो, वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात आधुनिक व परिपूर्ण चिकित्सापद्धती होमिओपॅथीचे जनक डॉ.सॅम्यूएल हनिमॅन यांच्या २६५ व्या जयंतीच्या व त्याचे औचित्य साधून आपण साजरा करीत असलेल्या "जागतिक होमिओपॅथी दिनाच्या" आपणास वैयक्तिक माझ्या तर्फे व महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे सर्व सदस्य आणि कर्मचारिवृंद यांच्यातर्फे कोटी कोटी शुभेच्छा. मित्रहो भारत सरकार च्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र आयुष संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय आपत्तिकाळात पुरेसे प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ हाताशी उपलब्ध असावे म्हणून सरकारने आखून दिलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे आखलेल्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमास आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आपले अभिनंदन व आभार. आत्ता या क्षणापर्यंत २५३२८ इतक्या मोठ्या संख्येने प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केला आहे हे अभिमानास्पद आहे उर्वरित नोंदणीकृत व्यावसायिकांना सुद्धा त्वरीत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आम्हा सर्वांचे आवाहन आहे. काही नतद्रष्ट व्यक्तींनी या प्रशिक्षण कार्यक्रमाबद्दल नेहमीप्रमाणे सोशल मीडिया वरून अत्यन्त हीन पातळीवरून प्रचार करून दिशाभूल करण्याचा व संभ्रम करण्याच्या केलेल्या प्रयत्नांना दाद न देता आपण आपल्या राष्ट्रीय कर्तव्याप्रति दाखवलेल्या निष्ठे बद्दल आम्हाला आपला अभिमान वाटतो सध्याच्या कोविड19 आपत्ती प्रसंगी उपचार व प्रतिबंध या करिता अत्यंत प्रभावी ठरू शकणाऱ्या होमिओपॅथी चिकित्सा पद्ध्तीने उपचार व संशोधन करण्याची परवानगी मिळावी या करीता केंद्रीय पातळीवर प्रयत्न करणारी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद ही पहिली स्टेट कौन्सिल असून त्याकरिता सीसीआरएच व आयुष मंत्रालय यांचेकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यात यश आले परंतु आरोग्य हा राज्य सुचितील विषय असला तरी सध्या साथ नियंत्रण अधिनियम व राष्ट्रीय आपत्ती निवारण अधिनियम देशभर लागू असल्याने या बाबतीतील सर्व मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे अधिकार केंद्रशासनाकडे असून त्याचे पालन करणे राज्य सरकारांना बंधनकारक आहे व केंद्रीय आरोग्य मंत्रालया च्या केवळ WHO च्या प्रोटोकॉल प्रमाणेच उपचार करण्याच्या सूचना असल्याने सीसीआरएच च्या अटीनुसार कोरोना उपचाराकरिता अधिसूचित रुग्णालयाचे अधिष्ठाता व एथिकॅल कमिटी चे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त होत नव्हते, आजच सोशल मीडिया वर मा आयुष मंत्री यांचे व्हायरल झालेल्या गोवा सरकारने दिलेल्या परवानगी संबंधीचे ट्विट अधिकृत असल्या बाबत खातरजमा करून घेऊन जर केंद्रीय आरोग्यखात्याने धोरणात बदल केले असतील तर अशी परवानगी महाराष्ट्रात पण मिळावी या करिता राज्यशासनास खातरजमा करून परवानगी मिळावी या करिता परिषदेमार्फत विनंती करून पाठपुरावा केला जात आहे हे आपल्या माहितीकरिता नमूद करीत आहे. २४×७ आपलाच.
डॉ. नितीन गावडे
अध्यक्ष एम सी एच मुंबई
Arogya Setu Mobile Applications